मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता मुख्यमंत्री ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाला संबोधित केलं. एका उद्योगविषयक संमेलनात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं असलं तरी कोरोना महामारीबाबत अद्यापही काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं.
‘अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं सगळं काही सुरू करायचं आहे. मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे. मात्र, त्यासाठी काही काळ थांबावं लागेल,’ असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी राज्याच्या उद्योग क्षेत्राबाबत भाष्य केलं. ‘ ‘उद्योग मित्र’सारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे ‘उद्योग मित्र’ राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे. गुंतवणूकीसाठी ‘आपलेपणा’ची भावना निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे,’ असं म्हणत ठाकरेंनी उद्योजकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.
पुढे ते म्हणाले, ‘इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणुकीचं आवाहन करतात. ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये. महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची खूप गरज आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढं जायचं आहे. उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत, असं मला वाटतं. त्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल,’ अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही – नवाब मलिक
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
