Share

‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली.  त्यामुळे सध्या तिला आणि कुटुंबीयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र यानंतर सध्या स्वतःला सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज कुंद्रा प्रकरणानंतर शिल्पा सोशल मिडियापासून देखील काही काळ दूर राहिली. मात्र आता पुन्हा एकदा ती सोशल मिडीयावर सक्रीय झाली आहे. नुकतेच तिने एका पुस्तकाचा फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले, ‘आपण आपल्या आयुष्यात पॉज बटण दाबू शकत नाही. प्रत्येक दिवस मोजतो.आपण आपल्या कठीण काळात असो किंवा आपल्या चांगल्या काळात.’

तर पुढे असे आहे की, ‘कधीकधी आपल्याला वेळेवर गोष्टी करायच्या असतात. जेव्हा आपल्याला तणाव वाटतो तेव्हा सोडून द्या. आपले आयुष्य पुढे चालले आहे, काहीही झाले तरीही. आपल्याकडे फक्त एकच वेळ आहे, बाकी काही नाही. प्रत्येक क्षण जगणे चांगले आहे, जेणेकरून वेळ आपल्या हातातून निसटू शकणार नाही,’ अशी पोस्ट करत ती  आयुष्यातील कठीण काळाचा सामना कसे करत आहे हे समजून येत आहे.

काही दिवसापूर्वीच तिने लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत पाहायला मिळाली. तसेच यावेळी तिला पाहून शोमधील कलाकार आणि चाहते देखील खुश झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!