Share

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार

Published On: 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार फोन टॅपिंग प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयकडे देणार आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने फोन टॅपिंग आणि पोलिस बदल्यांबाबतचे कागदपत्रे मागितले होते.

या कागदपत्रांचा देशमुख यांच्या प्रकरणात काहीही संबंध नाही, असा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळे कागदपत्रे मिळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका केली. सीबीआय आणि पोलिसांनी यावर एकत्रित तोडगा काढावा, असे न्यायालयाने मागील सुनावणीला सुचविले होते.

सीबीआयने मागणी केलेल्या कागदपत्रांमध्ये फोन टॅपिंग प्रकरणाचा समावेश आहे. मुंबई पोलिस या प्रकरणात तपास करीत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रारंभी कागदपत्रे देण्यासाठी नकार दिला होता. मात्र आता उच्च न्यायालयात राज सरकारने रश्मी शुक्ला यांच्या अहवालासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. प्रकरणात पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. याआधीच सीबीआयला महत्वपूर्ण वाटत असलेले कागदपत्रे राज्य सरकारने हस्तांतरित केल्यास देशमुखांविरोधात मोठा पुरावा सीबीआयला मिळेल, असं म्हटलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!