🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत. मुंबई, कोकणसह विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून राणेंच्या विधानाचे पक्ष समर्थन करत नसून त्यांच्यावर होणाऱ्या चुकीच्या कारवाईविरोधात मात्र पक्ष पूर्णपणे पाठीशी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आता भाजप खासदार गिरीश बापट यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना घरचा आहेर दिला आहे.
‘राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत,’ असं म्हणत बापट यांनी राणेंचे कान टोचले. पुढे ते म्हणाले, ‘त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा तुम्ही झोपले होते काय?’ उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल झाल्याने राऊतांचा संताप
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- नारायण राणेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
