🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत. नारायण राणेंविरोधात राणेंच्या घराबाहेर तुफान राडा घालणारे शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी आता पुन्हा भाजपला प्रतिसवाल केला आहे.
भाजपच्या मूळ नेत्यांमध्ये आमच्याशी सामना करण्याची धमक नाही. म्हणून आता उपऱ्यांना पुढं केलं जातंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रसाद लाड यांच्याकडे पाहिलं तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?, असा प्रतिसवाल वरुण सरदेसाई यांनी भाजपला विचारला आहे.
अटल बिहीरी वाजपेयी, लालकृष्म अडवानी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळात भाजप ‘पार्टी विथ डिफरेन्स’ होती. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कार वर्ग चालतात. आताच्या भाजपकडे पाहिल्यावर हेच का प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल पडतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जुहूतील प्रकारानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. जन आशिर्वाद यात्रा काढण्याची जबाबदारीही बाहेरुन आलेल्यांवर सोपवण्यात आली. यावरुनच सगळं काही स्पष्ट होतंय. संघ संस्कारात वाढलेल्या पुण्याच्या जुन्या कार्यकर्त्याला नारायण राणे यांची बाजू मांडावी लागते म्हणजे बघा, असं म्हणत वरुण सरदेसाईंनी भाजपला चिमटा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा तुम्ही झोपले होते काय?’ उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल झाल्याने राऊतांचा संताप
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- नारायण राणेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
