मुंबई – सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. या वादात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे. सत्तेचा कितीही दुरुपयोग करा परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे.भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नाही असेही नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपची खिल्ली उडवली आहे. भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे. तुम्हाला या थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काही तरी प्रॉब्लेम दिसतोय. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत. ज्यांना ही थप्पड सहा वर्षानंतर ऐकायला आली त्यांच्याकडे सर्जन पाठवून देण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मर्द को दर्द नहीं होता’, उपचारानंतर अभिषेकने शेअर केला फोटो
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची घसरण, ‘या’ खेळाडूने दिला धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

