🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात घडलेल्या घटनांविषयी भाष्य केले आहे. तसेच राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही, असेही पवार म्हणाले आहेत.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘बिहार निवडणूक प्रभावित करण्यासाठी पेटवण्यात आलेले अभिनेत्याचे आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत परत उकरुन काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही.’
बिहार निवडणूक प्रभावित करण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत परत उकरुन काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही. pic.twitter.com/EymSSyFyH1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 25, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचं राजकारण करुन उत्तर प्रदेशमधील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा.’ तसेच आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल, असेही पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine war : बायडेन रशिया-युक्रेन संघर्षावर भारतासोबत चर्चा करणार
“ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” मधील २ नावे मी विसरलो, ती म्हणजे…”, सोमय्यांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

