Share

Russia-Ukraine war : बायडेन रशिया-युक्रेन संघर्षावर भारतासोबत चर्चा करणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडत आहेत. दरम्यान रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमधील संकटावर अमेरिका भारताशी चर्चा करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सांगितले आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. मात्र अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या भारतीय समकक्षांसोबत भारतीय भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वतःचे धोरणात्मक स्वातंत्र्य राखले आहे. दरम्यान आज मोदी-बायडेन यांच्यात चर्चा होण्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान रशियाने युक्रेन लष्कराचे ७४ तळ उद्ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश आहे. तर दुसरीकडे रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे सैन्य काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!