🕒 1 min read
नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia-Ukraine War) पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यतच आता युक्रेनचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. युक्रेनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्यावर हसताना अॅडॉल्फ हिटलरचे (Adolf Hitler) व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले असून त्यांनी या हल्याला युक्रेनचे ‘निशस्त्रीकरण आणि निर्दोषीकरण’ करण्याच्या उद्देशाने लष्करी ऑपरेशन म्हटले आहे. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या कार्टूनला ‘मीम’ असे संबोधले असता, युक्रेन हँडलने आणखी एक ट्विट पोस्ट करत “हे मीम नाही, तर आत्ता आमचे आणि तुमचे वास्तव आहे.” असे म्हटले आहे.
— Ukraine / Україна (@Ukraine) February 24, 2022
दरम्यान रशियाने युक्रेन लष्कराचे ७४ तळ उद्ध्वस्त केले असून त्यात हवाई दलाच्या ११ तळांचा समावेश आहे. तर दुसरीकडे रशियाची ६ लढाऊ विमाने व एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे सैन्य कीव्हपर्यंत पोहोचले. तसेच रशियाचे सैन्य काही रणगाडेही उद्ध्वस्त केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आमच्या बैठकीचा चांगला परिणाम लवकरच पाहायला मिळेल- के. चंद्रशेखर राव
- ‘…घोटाळेबाजांना सोडणार नाही’; किरीट सोमय्यांचा इशारा
- के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत
- ‘…शिवसेनेला हिंदुत्त्व शिकवू नका’; दादा भुसेंचे वक्तव्य
- ‘आपल्याच देशात भगवद् गीतेच्या पठणाला विरोध…’; आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
