Share

जसप्रीत बुमराह संघात परतल्याने आशिष नेहरा नाखुश म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आगामी भारत विरुद्ध श्रीलंका T20I मालिकेत जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन पाहून आशिष नेहराला खूप आश्चर्य वाटले आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय आणि T20I मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आलेला बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग असेल. मात्र नेहराजींनी त्याच्या संघात असण्याबाबत नाराजी दर्शवली आहे.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित युवा गोलंदाज आवेश आणि हर्षलने चांगली कामगिरी केली होती. याच मुद्दयावर आशिष नेहरा म्हणाला ” मला खूप आश्चर्य वाटते की बुमराह या T20I मध्ये खेळत आहे. प्रत्येक खेळाडूला खेळायचे आहे, यात शंका नाही. परंतु या मालिकेनंतर आपल्याकडे दोन कसोटीही आहेत. आता बरेच सामने बाकी आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये संघाकडे बरेच पर्याय आहेत आणि त्यापैकी काहींना खेळासाठी वेळ आणि आत्मविश्वास हवा आहे. उदाहरणार्थ भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, आवेश खान यांना खेळासाठी अधिक वेळ हवा आहे. ज्या क्षणी बुमराह इलेव्हनमध्ये परतेल, त्या क्षणी यापैकी एका खेळाडूला स्थान मुकावे लागेल. त्यामुळे तो इथे खेळतोय याचे मला आश्चर्य वाटते आहे.”

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल. विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक चहर, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांसारखे काही प्रमुख खेळाडू टी-२० मालिकेला अनुपस्थित राहतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!