🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगावमधील निवासस्थानी आज(२५ फेब्रु.)पहाटेच ईडीने धाड टाकली असून अद्यापही ही चौकशी सुरु केली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वीच होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचेही बोलण्यात येत आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार यशवंत जाधव यांच्या घरी ईडीकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे. तसेच कारवाईचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.
A team of Enforcement Directorate (ED) arrives at the residence of Shiv Sena leader Yashwant Jadhav in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/FzKkLzdzXR
— ANI (@ANI) February 25, 2022
दरम्यान, यशवंत यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या या अगोदरच्या तपासात समोर आले असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘दाऊद ईब्राहिमचं नाव मुद्दाम घुसवण्यात येत आहे’; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
-
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
