🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली. तसेच या नेत्यांची यादी घेऊन दिल्लीत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असे असतांनाच आज(२५ फेब्रु.) पहाटे शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगावमधील निवासस्थानी ईडीने धाड टाकल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीनंतर सोमय्यांनी अजून एक ट्विट केले आहे.
ट्विटमध्ये किरीट सोमय्या म्हणाले आहेत की,‘ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” मधील २ नावे मी विसरलो. यशवंत जाधव, यामिनी जाधव परिवार आणि नगराध्यक्षा किशोरी पेडणेकर’, असे सोमय्या म्हणाले आहेत.
I have forgotten 2 names of Thackeray Sarkar's "Dirty Dozen"
Yashwant Jadhav, Yamini Jadhav Family
&
Mayor Kishori Pednekar @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 25, 2022
दरम्यान, सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’मध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड आदींचा समावेश आहे. तसेच मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत. ते कितीवेळा दबाव आणणार? पत्रकाराने सकाळी विचारलं ‘अब किस की बारी है’ मी म्हटलं चिठ्ठी टाकावी लागेल. दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू आहे, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
Russia-Ukraine war : बायडेन रशिया-युक्रेन संघर्षावर भारतासोबत चर्चा करणार
-
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
