Share

…म्हणूनच विरोधी पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात उडी घेत आहेत : रविशंकर प्रसाद

Published On: 

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ‘नवीन शेतकी कायद्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी उडी घेतली आहे. यूपीएच्या राजवटीत त्यांनी शेती क्षेत्रातील सुधारणांसाठी मोदी सरकार आज जे करत आहेत तेच केले’ असं म्हणत त्यांनी विरोधी पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याची जळजळीत टीका केली.

तर, ‘विरोधी पक्ष निवडणुकांमध्ये पराभूत होत असल्यानेच अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होत आहेत. ते मोदी सरकारला विरोध करायचा म्हणून फक्त विरोध करत आहेत. स्वतःचे भूतकाळातील काम ते विसरले आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने एपीएमसी कायदा रद्द करण्याचा आणि निर्यातीसह शेती उत्पादनांचा व्यापार सर्व निर्बंधांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते’ असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर शंका उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!