पुणे : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर आता अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते मात्र आता पुण्यात कोरोनाच्या दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुणे शहरात दिल्लीप्रमाणे दुसरी लाट येण्याची शक्यता कमी दिसते. ती आलीच तरी सौम्य स्वरुपात असेल, असे मत महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी व्यक्त केले आहे.दररोज वाढणारी रुग्णसंख्या 350 ते 450 च्या दरम्यान राहत आहे. त्यामुळे पुण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही. आलीच तर ती सौम्य स्वरुपात दिसून येईल, असे डॉ. वावरे यांनी आज ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना सांगितले.जरी लाट आली तरीही आमची यंत्रणा या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
टाळेबंदी शिथील केल्यानंतर पुण्यातल्या सार्वजनिक सेवा, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आले होते मात्र लोकांनी कोरोना प्रतीबंदासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. लोक आज मास्क लावत आहेत,सुरक्षित अंतर पाळत आहेत हात साबणाने स्वच्छ करत आहेत यामुळे कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत .
दरम्यान,देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आज आणखी वाढून 94.37 टक्के झाला आहे. आज सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त आहे. देशातले सुमारे 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या 22 पट आहे.
गेल्या महिनाभरापासून दैनंदिन रुग्ण वाढही 50 हजारांच्या खाली नोंदवली जात आहे. काल दिवसभरात सुमारे 36 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली तर 42 हजार रुग्ण या आजारातून बरे झाले. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत असून सध्या ते प्रमाण 4.2 टक्के आहे.सध्या देशभरात 4,03,248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या एकंदर बाधितांच्या केवळ 4.18 टक्के आहे. देशाचा कोविड मृत्यू दर सध्या 1.45 टक्के असून काल दिवसभरात या आजारामुळे देशात 482 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी करोना लस विकसित करण्यात येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. करोनावरील लस ही जादूची कांडी नसून करोनाचा संसर्ग पूर्णपणे संपणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र या लसीकरण दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा देखील महत्वपूर्ण आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- हार्दिक पंड्याची नव्हे तर ‘या’ खेळाडूची कामगिरी सामना जिंकवून देणारी : मूडी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

