Share

“..यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय ?”- संजय राऊत

Published On: 

मुंबई: निवडणुका संपल्या जनतेची गरज संपली. तेव्हा कालपर्यंत बाटलीत बंद करून ठेवलेला इंधन दरवाढीचा ‘राक्षस’ आता बाहेर काढला, यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय? पाच राज्यांच्या निवडणूक काळात बंद केले गेलेले जनतेचे कान आणि डोळे आता कदाचित खाडकन उघडले असतीलही, पण त्याचा आता काय उपयोग? ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणेच केंद्रातील विद्यमान राज्यकर्ते धोरण राबवीत आहेत. निवडणुका संपल्याने मतदार असलेल्या जनतेची गरजही तूर्त उरलेली नाही. म्हणूनच इंधन दरवाढीचे तेल आधीच भडकलेल्या महागाईच्या वणव्यात ओतण्यात आले आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ केंद्र सरकार रोखून धरेल आणि निकाल लागले की, या दरवाढीचा बुलडोझर सामान्य जनतेवर बिनदिक्कतपणे फिरविला जाईल अशी भीती व्यक्त होत होतीच. ती अखेर खरी ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबत घरगुती गॅसचे सिलिंडर थेट 50 रुपयांनी महाग करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल पुन्हा शंभरीच्या पुढे, तर घरगुती गॅस सिलिंडर एक हजाराच्या उंबरठय़ावर पोहोचले आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तर तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पाच राज्यांपैकी चार राज्यांत जनतेने भाजपच्या पदरात सत्तेचे ‘दान’ टाकले. त्याची भरपाई मोदी सरकारने ही अशी केली आहे. जनतेने यांच्या पदरात भरभरून मते टाकली, यांनी जनतेच्या खिशातील उरलासुरला पैसा इंधन दरवाढ करून ओरबाडून काढला. जनतेने केलेल्या उपकाराची परतफेड त्यांनी महागाईचे ‘गिफ्ट’ देऊन केली. मोदी सरकारचे हे नेहमीचेच धोरण आह . निवडणुका असल्या की , इंधन दरवाढ रोखून धरायची, निकाल लागले की, दरवाढीचा बुलडोझर अमानुषपणे फिरवायचा. आताही त्यापेक्षा वेगळे घडलेले नाही. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक काळात विरोधी पक्षदेखील याविषयी जनतेला सावध, करीत होताच, पण त्या वेळी ‘हिजाब’ , पाकिस्तान, हिंदू – मुसलमान असा भावभावनांचा कल्लोळ करून मोदी सरकार, भाजप आणि अंध भक्तांनी सामान्य जनतेचे कान आणि मन जणू व्यापून टाकले होते. आता निवडणुका संपल्याने मोदी सरकारने नेहमीचा खाक्या दाखविला आहे. अर्थात, एवढे करूनही 6 ऑक्टोबर 2021 नंतर पहिल्यांदाच गॅस दरवाढ केल्याचा आव हे आणतील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकूनही मागील 137 दिवस आम्ही इंधन दरवाढ रोखून सामान्य जनतेवर उपकारच केले, अशी मखलाशीही करतील. नाहीतरी यूपीए सरकारच्या तुलनेत महागाई नियंत्रणात ठेवण्यात आमच्या सरकारला यश आले आहे, असा कांगावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच महिन्यात राज्यसभेत केला होता. आता आम्ही महागाई नियंत्रणातच ठेवली आह , पण रशिया युक्रेन युद्ध आणि त्यामुळे जागतिक बाजारात उडालेला कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका आमच्या नियंत्रणात नाही , असे सांगून इंधन दरवाढीचे पाप केंद्र सरकार रशिया आणि युक्रेनच्या माथी मारू शकते. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!