Share

शिवीगाळ प्रकरणी सलमान खानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी

Published On: 

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या काही दिवसांपूर्वी काळविट प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता अंधेरी मजिस्ट्रेट कोर्टाने सलमानला पुन्हा समन्स बजावला आहे. जवळपास तीन वर्ष जुन्या सायकल वादाप्रकरणी सलमानला समन्स पाठवण्यात आला आहे. समन्स जारी करत सलमानला अंधेरीतील मेट्रोपोलिटन कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी सलमानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. फक्त सलमान नाही तर त्याचा बॉडीगार्ड नवाज इकबाल शेखला देखील कोर्टात हजर राहायचं आहे. त्यामुळे या प्रकरणी सलमानला दिलासा मिळतो की, त्याच्या अडचणीत वाढ होईल. सलमान संबंधित हे संपूर्ण प्रकरण 3 वर्षे जुनं आहे. त्यावेळी अशोक पांडे नावाच्या व्यक्तीने सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला.

सलमानच्या बॉडीगार्डची परवानगी घेत अशोक पांडे यांनी व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली. पण तरी देखील सलमान आणि त्याच्या बॉडीगार्ड असभ्य वर्तन केल्याचा आरोप पांडे यांनी केला. एवढंच नाही तर पांडे यांचा मोबाईल हिसकावून त्यांना शिवीगाळ देखील केली.त्यानंतर अशोक पांडे यांनी अंधेरीतील डीएन नगर पोलिस ठाण्यात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केली होती. ही घटना 24 एप्रिल 2019 ची असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!