मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात बांगलादेश संघ म्हटला की कोणालाही तो लिंबू टिंबू असल्याचे वाटते. प्रतिभावान गोलंदाजांचा ताफा असूनही त्यांना कमी लेखले जाते. मात्र आता बांगलादेशने पुन्हा आपल्या नावाचा डंका वाजवत क्रिकेट जगताला आपल्या प्रतिभेची जाणीव करून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत (SA vs BAN) सुरु असलेली एकदिवसीय मालिका त्यांनी २-१ ने जिंकली आहे. अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सने विजय मिळवला.
घरच्या संघाने नाणेफेक जिंकून आफ्रिका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यात ते ३७ व्या ओव्हरमध्येच १५४ वर सर्वबाद झाले. बांग्लादेशकडून तस्कीन अहमदने (taskin ahmad) ५ विकेट्स घेत ३५ धावा दिल्या. आफ्रिकेच्या १५४ चा पाठलाग करताना बांगलादेशने २६व्या ओव्हरमध्येच विजय निश्चित केला. ज्यात तमिम इकबालने धमाकेदार ८७ धावांची नाबाद पारी खेळली. सामन्यात आफ्रिकेला केवळ १ विकेट मिळवता आली.
Team's celebration with "Amra korbo joy" song after the series win.#BCB #Cricket #SAvBAN pic.twitter.com/Qw7hva9BHb
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 23, 2022
What a win! Series wrapped up before the sun set in Centurion. Well done Bangladesh. Shame we never get to see them ply their trade on our shores thanks to the elitist CA’s tour programming. #SAvBAN pic.twitter.com/caX0kNm654
— Daniel Davini (@davvers605) March 23, 2022
बांगलादेशच्या कामगिरीने क्रिकेट जगताला आश्चर्यचा धक्का दिला आहे. खासकरून भारतीय क्रिकेट चाहत्यांना. गेल्या वर्षी भारताने आफ्रिकेसोबत मालिका गमावली होती. आता त्याच आफ्रिका संघाचा बांगलादेशने धुव्वा उडवला आहे. तस्कीन अहमद आणि तमीम इकबालचे (tamim iqbal) त्यांच्या अप्रतिम कामगिरीसाठी सगळीकडून कौतुक होत आहे. बंगाल टायगर्सने पहिल्यांदा आफ्रिकेला परास्त करत ऐतिहासिक मालिका विजय केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एअरपोर्टवर ‘या’ तरुणीने कार्तिक आर्यनला असा केला प्रपोज! पहा व्हिडिओ
- “जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्यास सांगा, अजूनही…” – चंद्रकांत पाटील
- शिवीगाळ प्रकरणी सलमान खानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी
- रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा!
- “ईडीच्या कारवाईवर आम्ही भाष्य करणे उचित नाही”- प्रवीण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

