कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पाश्वर्भूमीवर कॉंग्रेस भाजपमध्ये आपापसात टीका होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवत थेट म्हणाले, जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्यास सांगा.
“अजूनही 24 तास बाकी आहेत. जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने ए बी फॉर्म देतो. नानाला अर्ज मागे घ्यायला सांगतो”, असं जाहीर आवाहन चंद्रकात पाटील यांनी केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लागण्यापूर्वीही जयश्री जाधव यांना भाजपकडून तिकीटाची ऑफर दिली होती. मात्र, जयश्री जाधव यांनी विनम्रपणे ती नाकारात काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
पुढे चंद्रकांत पाटील सजेत पाटील आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हणाले, ‘बिंदू चौकात स्टेज बनवतो, सतेज पाटील यांनी समोर यावं. 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं ते त्यांनी मांडावं. आम्ही 7 वर्षात काय केलं ते सांगतो. काश्मीर भारतात राहण्याबाबत जो अडसर होता तो नाहीसा झाला. 370 कलम रद्द करणं आवश्यक होतं. ते नरेंद्र मोदींनी केलं. महाराष्ट्रातील 5 वर्षाची यादी आम्ही देतो, तुम्ही 50 वर्षाची यादी द्या. 1 लाख 76 हजार कोटीचं मेट्रोचं काम आम्ही राज्यात आणलं. कोल्हापूर महापालिका एकदा ताब्यात द्या. पुण्यासारखी महापालिका करतो”, असा दावा पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

