मुंबई : रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले, रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पदही रिकामे झाले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आलं होतं. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरुवातीच्या काळात केवळ राजकारण नाही तर समाजकारणही मोठ्या प्रमाणात केलं आणि करत आहेत. चाकणकर अनेकदा सांगतात, “मी वैयक्तिकरित्या काम करत आहे. पण मला पुढे जाऊन सांगायचं आहे की, प्रत्येक महिलेला तिचं अस्तित्व असतं. महिलेचा संघर्ष हा जन्मापासून तो तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असतो. शाळा, महाविद्यालयातील मुली, शेतकरी महिला, नोकरदार महिला अशा सगळ्यांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो. अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या सगळ्या अडचणींना तोंड देत तिनं स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे या मताची मी आहे”.
महत्वाच्या बातम्या –


