🕒 1 min read
मुंबई: आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? आणि हा सवाल जर लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.
तसेच आर्यन खान प्रकरणात ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील. 25 कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे, असा खोचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या मालकीच्या या तपास यंत्रणा नाहीत. जर भारतीय जनता पक्ष या सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत ‘मालक’ बदलत असतात, हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. इतिहास याला साक्षीदार आहे. भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी साधनशुचिता, त्याग, राष्ट्रभक्ती वगैरे मानणाऱ्यांचा पक्ष होता. आज अशी अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे पक्षांतील जुने जाणतेही अस्वस्थ आहेत. खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही ‘वसुली’ करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अज्ञात NCB अधिकाऱ्याकडून मलिकांना पत्र, लवकरच करणार खुलासा
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान
- गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
