मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून भारतावर विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. मात्र यावेळी भारतातही काही ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीरमधील मुक्कामामुळे पाकिस्तान संघाचा T20 मधील विजय आणि भारताचा पराभव अशा प्रकारे साजरा होत असेल आणि भारतविरोधी घोषणा दिल्या जात असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के कश्मीर में रहते हुए पाकिस्तानी टीम की टी20 में जीत का और हिंदुस्तान की हार का इस तरह जश्न मनाया जाय और हिंदुस्तान विरोधी नारे लगाये जाएं तो यह निश्चित ही चिंता का विषय है। केंद्र सरकार को इसे गंभीरता से लेना चाहिए।
जय हिंद!! वंदेमातरम! pic.twitter.com/EIsYBbZvu1— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2021
दरम्यान राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर सुरू असलेला जल्लोष दिसत आहे. काही जण हातात झेंडे घेऊन नाचत असून काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत. यावरूनच त्यांनी केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- किरण गोसावी यूपी पोलिसांना जाणार शरण; काय असेल कारण??
- महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप
- कोण ढ, कोण हुशार? ..एकाच बाकावर विद्यार्थी दोन!
- समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही? याबाबत गृहमंत्र्यांचंं सूचक वक्तव्य
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान


