Share

मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान

Published On: 

लखीमपुर : उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी मध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अमानुषपणे गाडीने चिरडण्याचा आरोप असणाऱ्या आशिष मिश्रा याला डेंगूची लागण झाल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या रक्तातील साखर वाढल्याने त्याची तब्येत बिघडली असून डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.

आशिष मिश्रा तुरुंगात असताना त्याला ताप आल्याने तसेच त्याला डेंगूची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. लखीमपूर खिरी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनीही याबाबत माहिती दिली. केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न हा आशिषने केल्याचे दिसले होते. त्यामध्ये ८ लोक मरण पावले असून त्यातील ४ जन शेतकरी होते.

यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. अनेकांनी भाजपा सरकारला यावरून लक्ष केले होते. तर काहींनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. महाराष्ट्रात सुद्धा या घटनेचे लोण पसरले होते. राज्यातील महाविकास आघाडी ने या घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!