Share

गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप

Published On: 

नवी दिल्ली: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाचे आरोप केले आहेत. प्रमोद सावंत यांनी कोरोना काळात परिस्थिती नियंत्रणात ठेवली नाही. यात ते अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर आवाज उठवल्यामुळेच मला तेथून हटवण्यात आले, असा आरोपही सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

गोव्यातील प्रमोद सावंत सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून, यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता. गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आले. मात्र चरण सिह यांचा सहवास मला लाभला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, अशी भूमिका सत्यपाल सिंह यांनी आता घेतली आहे.

दरम्यान गोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना एका कंपनीच्या सांगण्यावरून राबवली. या कंपनीने सरकारला पैसेही दिले. काँग्रेसने याबाबत चौकशी करण्याची विनंती मला केली होती. त्यानुसार चौकशी केली आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, असेही मलिक यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!