मुंबई: कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची कारवाई भ्रष्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यातच आता NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून नवाब मलिकांना पत्र आले आहे. याबाबतीत मी लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
‘एका अज्ञात NCB अधिकाऱ्याकडून मला मिळालेल्या पत्राचा लिफाफा असा एक फोटो पोस्ट करत त्यातील मजकूर मी लवकरच ट्विटरवर प्रसिद्ध करणार आहे. असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.
Envelope of the letter received by me from an unnamed NCB official.
Contents of which I will be releasing soon on Twitter pic.twitter.com/uPAO2F5XKP— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
दरम्यान ‘मी लवकरच ‘स्पेशल २६’ रिलीज करणार आहे. जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग’ असे खोचक ट्वीट नवाब मलिक यांनी करत पुन्हा एक खुलासा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. तर क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील एनसीबीचे विभागीय संचालक असलेले समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. त्यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली असल्याचा आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- किरण गोसावी यूपी पोलिसांना जाणार शरण; काय असेल कारण??
- महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप
- कोण ढ, कोण हुशार? ..एकाच बाकावर विद्यार्थी दोन!
- समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही? याबाबत गृहमंत्र्यांचंं सूचक वक्तव्य
- मंत्रीपुत्र आशिष मिश्रा रुग्णालयात दाखल; डेंगी झाल्याचे निदान


