Share

नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली असल्याचा आरोप केला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील एनसीबीचे विभागीय संचालक असलेले समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. त्यापूर्वी नवाब मलिक यांनी त्यांच्यावर काही आरोप केले आहेत. आता आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत इशारा दिला आहे.

‘मी लवकरच ‘स्पेशल २६’ रिलीज करणार आहे. जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग’ असे खोचक ट्वीट नवाब मलिक यांनी करत पुन्हा एक खुलासा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

दरम्यान दरम्यान,’मी त्यांच्या जन्माचा दाखला प्रसिद्ध केला आहे. दावूद वानखेडेंनी धर्मांतर केल्यावर हा जन्मदाखला काढण्यात आला. त्यावर खाडाखोड करण्यात आली. इथूनच त्यांची बोगसगिरी सुरु झाली. हळूहळू मी सगळी बोगसगिरी बाहेर काढेन. त्यांचा हा काळा अध्याय मी जनतेसमोर आणणार आहे. त्यांच्या पत्नीचा फोटो मी नाही, लोकांनीच पुढे आणला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. नोकरीसाठी त्यांनी बोगस दाखला काढून ही नोकरी मिळवली आहे’, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!