Share

‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक

Published On: 

मुंबई : वर्षभरापूर्वी धक्कादायक राजकीय खेळी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीबाबत आतल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे पुस्तक ‘ट्रेडिंग पॉवर’ लेखिका प्रियम गांधी यांनी लिहीले आहे.

या पुस्तकात गांधी यांनी फडणवीस आणि पवार यांच्यातील संवाद जसेच्या तसे छापले आहेत. या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे असून अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेण्यासाठी कसे तयार झाले? शरद पवारांचे मत काय होते? अजित पवारांनी त्यावेळी कोण कोणत्या आमदारांची नावे घेतली होती? इत्यादी माहिती या पुस्तकात आहे.

दरम्यान, मराठी माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये गांधी म्हणाल्या की, शरद पवारांचा निरोप घेऊन नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला वर्षा बंगल्यावर NCP चे दोन बडे नेते गेलेत. यामध्ये शरद पवारांना भाजपाला समर्थन देण्यास आक्षेप नसल्याचा हा मेसेज होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी अमित शहांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांची सर्व बातचीत झाली. कुणाला कोणते मंत्रीपद मिळणार हे देखील ठरलं होतं. यावेळी राज्यात राष्ट्र्वापती राजवट आणण्यात NCP मदत करेल हेही या ठरलं होतं. राष्ट्रपती राजवटीनंतर काही दिवसांनी शरद पवार माध्यमांसमोर येऊन राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगून भाजपच्या सोबत जातील असं लेखिका म्हणाल्यात.

या पुस्तकावरुन राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका होती, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचीच शरद पवार यांची भूमिका होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांनी बेईमानीनं सरकार बनवलं त्यांची बाजू यात मांडण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रतिमा मलिन झाली आहे. ती स्वच्छ करण्यासाठीच हे पुस्तक लिहिण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!