Share

काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी

Published On: 

नवी दिल्ली- कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार रोशन बेग यांना तीन दिवसांसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत ते सीबीआयच्या ताब्यात असणार आहेत. आयएमए घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे.

आयएमए या नावाने दागिन्यांची कंपनी सुरू करून त्यात लाखो लोकांना गुंतवणूक करण्यास भुरळ घातलेल्या आणि नंतर पैसे बुडवलेल्या प्रकरणात आता माजी मंत्री रोशन बेग यांना अटक झाली आहे. त्यांनी कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक मन्सूर अली खानला मदत केल्याचा संशय आहे. रविवारी सीबीआयने त्यांना अटक केली.

मन्सूर अली सीबीआयच्या अटकेत असून, त्याने बेग यांच्याकडे या घोटाळ्यातील 400 कोटी रुपये असल्याचे जबानीत म्हटले होते. त्यानुसार सीबीआयने रविवारी सकाळी बेग यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सायंकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!