नवी दिल्ली- राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी म्हणजेच NIIF च्या माध्यमातून कार्यरत असलेल्या एन आय आय एफ इन्फ्रास्ट्रक्टचर डेट फायनान्सिंग प्लॅटफॉर्ममध्ये 6 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत ज्या 12 विविध योजनांची घोषणा केली होती; त्यातलीच ही एक आहे. लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेलाही आज मान्यता देण्यात आली. ब्रिक्स देशांशी झालेल्या संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही मंजुरी देण्यात आली.
Union Cabinet approves Scheme of Amalgamation of Lakshmi Vilas Bank with DBS Bank India Limited. With this, there'll be no further restrictions on depositors regarding the withdrawal of their deposits: Union Minister Prakash Javadekar https://t.co/Vk5xxP6sIw
— ANI (@ANI) November 25, 2020
आता या बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला प्रस्ताव दिला होता जो मंजूर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हप्ता घेणारे आहात का? नांदगावकरांचा अनिल परब यांना सवाल
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संघटनेत मी कधीही ढवळाढवळ केली नाही – रामदास आठवले
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं


