मुंबई – भारतीय दलित पँथर मध्ये माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून जे काम करीत होते असे अनेक कार्यकर्ते बौद्धजन पंचायत समिती च्या निवडणुकीत नेहमी निवडुन येत असत. आर जी रुके आणि प्रा.रमाकांत यादव यांच्या जोडीचा बौद्धजन पंचायत समितीवर ठसा होता. त्यांचे पॅनल नेहमी निवडून येत असत. ते दोघेही माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष वाढू शकतो अशी भूमिका मांडत असत. ते दोघेही बौद्धजन पंचायत समिती चे प्रमुख नेते माझ्या पक्षात होते.पण मी कधीही बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संघटनेत ढवळाढवळ केली नाही. आर जी रुके आणि प्रा. रमाकांत यादव यांना निर्णयाचे कामकाजाचे पूर्ण स्वातंत्र्य होते. माझा नेहमी बौद्धजन पंचायत समितीला पाठिंबा राहिला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.
गोराई येथील हॉटेल बेव्ह्यू च्या सभागृहात रिपाइं तर्फे आयोजित दिवंगत बौद्धजन पंचायत समिती चे माजी सभापती दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांच्या जाहीर आदरांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती सीद्धार्थ कॉलेज चे उपप्राचार्य इतिहासाचे प्राध्यापक रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष दिवंगत रमाकांत यादव यांच्या जाहीर आदरांजली सभेत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रा. रमाकांत यादव यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील जुन्या आठवींना उजाळा दिला.
यावेळी रिपाइं चे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुमंत राव गायकवाड,भाजप चे आमदार विजय भाई गिरकर,रिपाइं चे काकासाहेब खंबाळकर तसेच दिवंगत प्रा.रमाकांत यादव यांच्या पत्नी शीला यादव,मुलगी अस्मिता कासले,प्रा.प्राची कदम,मेघा यादव मुलगा सचिन यादव हे कुटुंबीय तसेच भन्ते शांतिरत्न रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव,प्रकाश कमलाकर जाधव, प्रिन्सिपल आर एल तांबे,ऋषी माळी,चंद्रकांत पाटील,चंद्रशेखर कांबळे,रमेश गायकवाड, भावेश तन्ना; ऍड अभया सोनवणे,उषा रामळु,सोना कांबळे,भीमराव सवातकर, दिलीप व्हावळे,बाळासाहेब कोकिसरेकर,रश्मी यादव,अशोक कांबळे,सुनील गमरे,रमेश बनसोडे,आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा.रमाकांत यादव यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.ते इतिहासाचे प्रभावी प्राध्यापक आणि गाढे अभ्यासक होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.ते विचारवंत होते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारे लोकप्रिय प्राध्यापक म्हणून आजही दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांच्या आठवणी सांगीतल्या जात आहेत. असे सांगत ना. रामदास आठवले यांनी दिवंगत प्रा.रमाकांत यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हप्ता घेणारे आहात का? नांदगावकरांचा अनिल परब यांना सवाल
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं


