मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाणार प्रकल्पाबाबत असलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांची नाणारवासियांनी सोमवारी भेट घेतली असून, या भेटीत राज ठकरे यांनी नाणारवासियांसमोर हा दावा केला. तर, शरद पवार मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात भेट घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही तरी शरद पवारांना नक्की वेळ देतील, असा टोला राज यांनी यावेळी लगावला.
कोकणात पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करण्यासाठी भविष्यात त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना, ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, असे राज यांनी स्पष्ट केले आहे . नाणार प्रकल्पाच्या बाजूने राज ठाकरे यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. अशा प्रकल्पातून मिळणारा रोजगार हा मराठी माणसांना मिळणे अपेक्षित आहे. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
राज ठाकरे यांच्या नाणारबद्दलच्या भूमिकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. मला त्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. शिवाय, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प ही ग्रीन रिफायनरी आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील.
नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हितासाठी झाला पाहिजे, असा आग्रह देखील फडणवीस यांनी धरला आहे नाणारमुळे कोकणचा विकास होणार असून, नाणार प्रकल्प हा राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारेवरची कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला’
- पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीचा अपघात, महिला दिनीच महिलेचा बळी
- ‘अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते’
- ‘हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा अर्थसंकल्प’
- ‘अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

