Share

‘लवकरच भारताला देखील नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येईल’

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलेच शाब्दिक वार पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते, आमदार, तसेच अभिनेते मिथून चक्रवर्तींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून खवळलेल्या ममता बॅनर्जींनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वोत मोठ्या क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. तर कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो देण्यात आलेला आहे. यावरून निशाणा साधत ‘लवकर भारताला देखील नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येईल’, असे म्हणत ममता बॅनर्जींनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

जगातील सर्वोत मोठ्या क्रिकेट स्टेडियमला मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे करण्यात आले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!