Share

थायलँड पोलिसांकडून नवीन खुलासा; शेन वॉर्नच्या रूममध्ये रक्ताचे डाग आढळले

Published On: 

मुंबई: शेन वॉर्नच्या अकस्मित निधनामूळे संपूर्ण क्रिकेट जगताला मोठा धक्का लागला आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला अशी माहिती आधी मिळाली होती. याबाबत आता एक नवीन खुलासा झाला आहे. थायलँडच्या पोलिसांना कोई सामुई बेटावरील व्हिलामध्ये शेन वॉर्नच्या खोलीच्या मजल्यावर आणि आंघोळीच्या टॉवेलवर “रक्ताचे डाग” आढळून आले आहेत.

एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीच्या अनुसार, तपासकर्त्यांना वॉर्न (shane warne) राहत असलेल्या खोलीत जमिनीवर रक्त आणि बाथ टॉवेल आढळले. अहवालात असेही म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन अधिकारी थायलँडमध्ये आले आहेत आणि वॉर्नचा मृतदेह परत आणण्याचे काम करत आहेत. “ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी वॉर्नला छातीत दुखू लागल्याचे समजते आणि त्याला हृदयविकार आणि दम्याचा आजार होता. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या अहवालात असे म्हटले आहे की, वॉर्नच्या खोलीच्या मजल्यावर आणि व्हिलाची झडती घेत असताना तपासकर्त्यांना आंघोळीच्या टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले,” असे अहवालात म्हटले गेले आहे.

शेन वॉर्न त्याचे वजन कमी करण्यासाठी १४ दिवस फक्त लिक्विड डायट घेत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे हे देखील त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याचे कारण समजले जात आहे. वॉर्नला स्मोकिंगची सवय होती असे त्याचे सहकारी आणि जवळच्या लोकांनी सांगितले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका या कारणांनी आला असे समजले जात असले तरी त्याच्या खोलीत असलेल्या रक्ताच्या डागांबाबत अजूनही कोणती माहिती मिळालेली नाही. शेन वॉर्नच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगत हळहळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!