🕒 1 min read
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकाच्या मोहिमेला रविवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून सुरुवात केली. परंतु सामन्यानंतर या दोन्ही संघामध्ये प्रेमाचे संबंध दिसले. पाकिस्तानचा कर्णधार बिस्माह मारुफची मुलगी फातिमा हिने भारतीय क्रिकेटपटूंची मने जिंकली. भारतीय खेळाडू तिच्या सोबत मस्ती करताना, फोटो काढताना दिसल्या. याचाच एक फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय महिला क्रिकेटर्सचे कौतुक (Jitendra Awhad praises Indian women cricketers) केले आहे.
“पाकिस्तानी क्रिकेटपटू बिश्मन मारुफ हिच्या चिवल्याशा लेकीचे लाड करताना भारतीय महिला क्रिकेटपटू. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय मुलींनी पाकिस्तानला दणकून हरवलं. पण मैदानावरची स्पर्धा मैदानाबाहेर नसते. एक फोटो खूप काही शिकवतो.”, असे ट्वीट करत आव्हाड यांनी त्यांचा फोटोही पोस्ट केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू बिश्मन मारुफ हिच्या चिवल्याशा लेकीचे लाड करताना भारतीय महिला क्रिकेटपटू.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय मुलींनी पाकिस्तानला दणकून हरवलं. पण मैदानावरची स्पर्धा मैदानाबाहेर नसते. एक फोटो खूप काही शिकवतो.#love #NoWar#Peace pic.twitter.com/chFTVrsa5D
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 7, 2022
दरम्यान या फोटोमध्ये हरमनप्रीत कौर (harmanpreet kaur) आणि स्मृती मंधाना (smriti mandhana) सोबत इतर खेळाडूही लहानग्या फातिमाला हसवायचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच ट्रेंड होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्णधार रोहित शर्माचे जडेजाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला मी त्याला…
- खरीपात भासणार खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहणार!
- हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी
- नारायण राणे ‘आधीश’ बंगल्यामुळे अडचणीत; BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस
- जनरल व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावर राऊतांचे टीकास्त्र; म्हणाले, “सध्या मंगळावरचे राहू द्या…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
