Share

“ईडी” पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या “गणेश बिडीची” किंमत जास्त – धनंजय मुंडेंचा खोचक टोला

Published On: 

उस्मानाबाद : पक्षाच्या मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल उस्मानाबाद दौऱ्यावर गेले होते. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे व धनंजय मुंडे हजर होते. धनंजय मुंडे वेगवेगळ्या मुद्यांवर बोलले. जगाला कोणी खरी लोकशाही घडवून दाखवली असेल ते फक्त पवार साहेबांनी. 64 आमदारांचे मुख्यमंत्री तर 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले तर 105 वाले विरोधी पक्षात बसले असे धनंजय मुंडे म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन धनंजय मुंडे यांनी सरळ निशाणा साधला. एवढेच नाही तर “नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत पण भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही” असे म्हणत जोरदार टीका केली.

भाजपच्या अंगातला माज गेला नाही, होत्याच नव्हत आणि नव्हत्याच होत केलं तरी मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे इन्कम टॅक्स काय इडी काय सुरु आहे. “ईडीची इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे”. यांना वाटतंय आपण त्यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत दाखवून द्या. परत भाजप महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही असे बोलत धनंजय मुंडे यांनी टोलेबाजी केली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!