Share

वाटले नव्हते की एवढ्या लवकर सामन्याचा निर्णय लागेल, श्रीलंकन दिग्गजाचे वक्तव्य

Published On: 

नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात जडेजाने सर्वाधिक नाबाद १७५ धावा केल्या. या सामन्यावर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

तो म्हणाला की “आम्ही कधीही विचार केला नव्हता की एवढ्या लवकर सामन्याचा निर्णय लागेल. आमच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. जेव्हा तुम्ही भारताविरुद्ध खेळता तेव्हा तुम्हाला चांगली सुरुवात करून मोठी धावसंख्या उभारता आली पाहिजे. या खेळपट्टीवर एकदा खेळाडू सेट झाला की त्याला फलंदाजीसाठी सोपे जाते. आम्ही एक अतिरिक्त जलदगती गोलंदाज खेळवला, आम्हाला वाटले होते की खेळपट्टी जलदगती गोलंदाजीला साथ देईल परंतु सगळे उलटेच झाले. आम्ही चांगली गोलंदाजी केली असती तर भारताला जास्त धावा करता आल्या नसत्या. आम्ही थोडी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आमच्या विकेट्स लवकर गेल्या.”

मोहाली कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५७४ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा पहिला डाव १७४ धावांवर ऑलआउट झाला. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुश्की ओढवली. परंतु दुसऱ्या डावातही त्यांचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला या डावात त्यांनी १७८ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!