मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची तिसरी पीढी ‘असफल’ ठरली असल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुंबईत पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यातच दरड कोसळल्यामुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वाला मुंबई महानगर पालिका आणि ठाकरे परिवार जबाबदार असल्याचे खासदार राणा यांनी म्हटले आहे.
संसदेच्या अधिवेशनामुळे खासदार राणा सध्या दिल्लीत आहेत. मात्र, त्यांनी मुंबईतील पावसामुळे झालेल्या परिस्थितीवरुन ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास कमी पडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई तुंबली,मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात ,ठाकरेंची तिसरी पिढी असफल,मनपा चे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा,,माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास pic.twitter.com/SfKOvsyqgO
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) July 19, 2021
या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी टीका करताना खासदार राणा म्हणाल्या की, ‘मुंबई तुंबली, मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात, ठाकरेंची तिसरी पिढी असफल, मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा, माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ‘देशमुखांचे वय झालेय, त्यांना आता लपाछपीचा खेळ झेपणार नाही’, अतुल भातखळरांचा टोला
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी


