मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुखांची ४ कोटी २० लाखाची संपत्ती जप्त केली केली. त्यांच्यावर ईडीचा आरोप आहे की त्यांनी आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपयाची खंडणी घेतली.
मालमत्ता जप्तीनंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी परत समन्स बजावला. त्यांनी त्याचेही उत्तर दिले नाही. तसेच त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे मुळ गाव काटोल येथील निवासस्थानी व नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. तरीही देशमुखांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावला त्यांनी तीनही वेळा वेगवेगळी करणे दिली. कधी कोरोनाचे कारण तर कधी प्रश्नावलीची मागणी करत त्यांनी चौकशी टाळली.
या प्रकरणावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देशमुखांवर टीका केली आहे. ‘माध्यमातील बातमीनुसार जर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब झाले आहेत. देशमुखांचे वय झाले आहे, या वयात लपाछपीचा खेळ त्यांना झेपेल असे वाटत नाही’ असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार
दरम्यान, माध्यमांत आलेल्या बातम्यांनतर अनिल देशमुखांनी आता समोर येत खुलासा केला आहे. ‘ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे. पण काही वर्तमानपत्रात 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय.
तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

