Share

‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल

Published On: 

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर करतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. पण ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा जगातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी समर्पित असल्याचं केंद्र सरकारने म्हटलेय. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भारत सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “पेगाससच्या म्हणण्यानुसार ते आपलं सॉफ्टवेअर कुणाही ऐऱ्यागैऱ्याला विकत नाहीत. संबंधित देशाच्या मान्यताप्राप्त सरकारलाच विकतात. खुद्द भारत सरकारने ते विकत घेतलं आणि त्याचा वापर केला असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. ज्या ४० देशांनी ते घेतलंय त्यांची नावं सांगायला मात्र ते तयार नाहीत,” असे ट्विट आव्हाड यांनी केलेय.

फोन टॅप केले जात असतील तर त्याला जो निधी लागतो तो कोणी मंजूर केला? की त्यातही नविन कांड आहे? तज्ञांच्या मते ५० फोन निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी १० मिलियन डॉलर लागतात. एवढ्या फोन्ससाठी किती खर्च आला असेल? कुणी तो मंजूर केला? की त्यातही नवीन कांड आहे?” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!