Share

कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड

Published On: 

जळगाव : आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्री मंडळात समाविष्ट करून घेण्याबद्दल भाजपच्या चित्रा वाघ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावर संजय राठोड म्हणाले की, ‘कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार’. खानदेश दौऱ्यावर असलेल्या राठोड यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले.

पूजा चव्हाण प्रकरणात तुम्हाला क्लीन चीट मिळाली का असा प्रश्न माध्यमांनी राठोड यांना केला. यावर ते म्हणाले, ‘या विषयावर आधी आपण बोललो आहोत. पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर योग्य वेळ आल्यावर माध्यमांना कळवण्यात येईल.

नुकतेच संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चीट मिळाल्याची चर्चा होती. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की ‘मी पुणे पोलीस आयुक्त यांच्यासोबत बोलले आहे. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. संजय राठोड यांना अद्याप क्लीन चीट मिळालेली नाही. तसेच हे सरकार बलात्काऱ्यांना राजाश्रय देत आहे. संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याला आमचा विरोध असेल.’ असेही चित्रा वाघ यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!