Share

राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी

Published On: 

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर करतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. पण ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा जगातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी समर्पित असल्याचं केंद्र सरकारने म्हटलेय.

काय आहे नेमके प्रकरण?

न्यूज पोर्टल ‘द वायर’च्या दाव्यानुसार, २०१७ ते २०१९ ह्या दोन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने जवळपास ३०० भारतीयांवर ते वापरत असलेल्या फोनच्या माध्यमातून पाळत ठेवली. यात काही पत्रकार, विरोधी पक्ष नेते, वकिल, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि न्यायाधींशाचाही समावेश आहे. पेगासस नावाचं स्पायवेयर आहे त्याच्या माध्यमातून फोन हॅक करुन पाळत ठेवली गेलीय. विशेष म्हणजे २०१९ लाही राज्यसभेत हा मुद्दा गाजला होता. २०१९ मध्ये व्हाट्स अपने पेगासस बनवणाऱ्या कंपनीच्याविरोधात खटला दाखल केलाय.

दहशवादी कारवाया शोधण्यासाठी पेगाससचा वापर

पेगासस बनवलेल्या इस्त्रायली कंपनी एनएसओने दिलेल्या माहितीनुसार या सॉफ्टवेअरचा वापर फक्त सरकारी कामांसाठी म्हणजेच दहशवादी कारवायांचा शोध घेण्यासाठी केला जातो. पेगासस प्रोजेक्टच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत १० भारतीयांचे फोन नंबर पेगाससकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाला. यात एका वृत्तसंस्थेच्या बातमीदार रोहिनी सिंग यांचा नंबर लीक झाला आहे. तर रोहिनी सिंग यांच्याव्यतिरिक्त आणखी दोन पत्रकारांचे नंबरही लीक झाल्याचे या यादीतून दिसून आले आहे.

भारतातील वरिष्ठ पत्रकारांवर पाळत

दरम्यान, पाळत ठेवण्यासाठी संभाव्य लक्ष्य म्हणून जगभरातील व्यक्तींच्या नावांची तयार केलेली यादी ‘लिक’ झाली असून यामध्ये चाळीस भारतीय पत्रकारांची नावे असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व पत्रकार संवेदनशील विषयांवर काम करत होते. भारतातील हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क १८, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्त समूहांच्या वरिष्ठ पत्रकारांचे मोबाईल क्रमांक या यादीत असल्याची चर्चा आहे

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!