मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतर करण्यास विरोध दर्शवल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. यावरूनच गेले काही दिवस भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात सुरु ठेवला आहे. अशातच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांना स्मरण पत्र पाठवून कळवले आहे. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’
- पदवीधर निवडणुकीत घोटाळा ? अनेक मतपत्रिका कोऱ्या होत्या; भाजपचा गंभीर आरोप
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी द्या; काँग्रेसची मागणी
- ‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांमध्ये तणाव आणि संशयाचं वातावरण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
