Share

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी द्या; काँग्रेसची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस स्वबळावरच लढेल असं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार काँग्रेसने तयारी देखील सुरु केल्याचं दिसून येत आहे. भाई जगताप यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही वॉर्डमध्ये 100 दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन आखलाय, वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आहे असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘मनपाच्या तिजोरीवर जवळपास 168 कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचं,’ असं देखील त्यांनी नमूद केलं. ‘पाणी माफिया मोठ्या प्रमणात पाणीचोरी करतात, त्याऐवजी हे पाणी गोरगरिबांना मिळायला हवं.’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!