Share

‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्यास विरोध दर्शवल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. यावरूनच गेले काही दिवस भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात सुरु ठेवला आहे. औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर असं नामकरण करु असा शब्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

यावरून आज चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. ‘औरंगाबाद मनपाची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर संभाजीनगर नाव देऊ असे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील जी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही अहमदाबादचे नाव बदलून दाखवतो. वाटल्यास तुमचं नाव देतो. इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन अहमदाबादच नाव बदलता येत नाही का!,’ असा टोला मिटकरींनी लगावला होता.

यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीय. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना…” अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. तर, ‘औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडी फक्त महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राजकारण करत आहे.’ अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हे टिकासत्र अजूनही सुरु आहे. मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराज असं नाव विमानतळाला देण्यासाठीचा प्रस्ताव अद्यापही केंद्र सरकारकडे अडकला आहे यावर प्रकाश टाकत चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. “अहो दादा बिहार मध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात, त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही? असे मोघलांसारखे काय बोलता.आम्ही ‘छत्रपती संभाजी महाराजांचं’ नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?” असा सवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांना उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!