🕒 1 min read
मुंबई : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. या निवडणुकांमध्ये भाजपला गेली अनेक दशकं वर्चस्व असलेला नागपूर मतदारसंघ गमवावा लागला. तर, पुण्याचा बालेकिल्ला देखील भाजपच्या हातून निसटला. यासह इतर जागांवर देखील भाजपला पराभव स्वीकारत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मत पत्रिका या कोऱ्या होत्या,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर, यासंदर्भात आपण पुराव्यांनिशी पत्रकार परिषद घेणार असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चांना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’
- गृहिणींना देखील मिळणार महिन्या अखेरीस आर्थिक वेतन !
- वाढवण बंदराला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले
- मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी द्या; काँग्रेसची मागणी
- ‘पुन्हा एकदा सिद्ध झालंय, राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांबाबत गंभीर नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
