ऑस्ट्रेलिया : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. उद्या म्हणजेच सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट सामन्याला जास्त महत्व असणार आहे. कारण, जो संघ हा सामना जिंकेल तो मालिका जिंकण्याच्या अधिक जवळ जाणार आहे. अशातच, मधल्या काळात हिटमॅन रोहित शर्मा याच्या खेळण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियायात दाखल झाला. त्याने कोरोनाच्या विलगीकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पार केले होते. दरम्यान, एका चाहत्याच्या विवादित पोस्ट व भेटीमुळे रोहित, रिषभ पंत, पृथ्वी शॉ व अन्य दोन खेळाडूंनी नियम मोडल्याचे समोर आल्याने त्यांच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
गळाभेट दिल्याची पोस्ट ही उत्साहाच्याभरात या चाहत्याने केल्याचं स्पष्ट केलं होतं. पंतने गळाभेट घेतली नसल्याचे समोर आलं. त्यामुळे रोहित शर्माच्या पुनरागमानाचा मार्ग मोकळा झाला आहे. रोहितकडे उपकर्णधारपदाची सूत्रे देखील सोपवण्यात आली आहेत. त्याच्या येण्याने भारतीय संघाची फलंदाजी अधिक बळकट झाली असल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मात्र चांगलीच धडकी भरली आहे.
रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधला खतरनाक बॅट्समन आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. त्याच्याविरुद्ध बोलिंग करण्याचं आम्हाला विशेष आव्हान असेल. परंतु त्यासाठी आम्ही विशेष रणनिती बनवली आहे. रोहितविरुद्ध आम्ही आम्हीलाच आव्हान दिलं आहे, असं ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन म्हणाला आहे. सुरुवातीच्याच काही ओव्हरमध्ये आम्ही रोहित शर्मावर हावी होण्याचा प्रयत्न करु. रोहितच्या बॅटिंगला तसंच त्याच्या आक्रमक फटक्यांना आम्ही रोख लावला तर इतरही बॅट्समनना आम्ही स्वस्तात परतावून लावू शकू, हा आम्हाला विश्वास आहे, असं देखील तो म्हणाला आहे. त्यामुळे रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज प्रयत्न करतील हे स्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देण्यासाठी केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?’
- पदवीधर निवडणुकीत घोटाळा ? अनेक मतपत्रिका कोऱ्या होत्या; भाजपचा गंभीर आरोप
- वाढवण बंदराला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले
- मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत पाणी द्या; काँग्रेसची मागणी
- ‘पुन्हा एकदा सिद्ध झालंय, राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांबाबत गंभीर नाही’


