🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईमध्ये परत येण्याची भावनिक साद घातली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मिश्किल पद्धतीचं ट्विट केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना भावनिक साद घालण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे, असा टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे. विमानाचा खर्च परवडणार नाही त्यामुळे बैलगाडीतून आमदारांना परत आणा असा चिमटा गजानन काळे यांनी ट्विट च्या माध्यमातून काढला आहे.
“भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे” अशा आशयाच ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी केल आहे.
भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही)
नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे ????
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 29, 2022
छोटे नवाब म्हणजेच आदित्य ठाकरे यांना शिंदे गटात सामील करून त्यांचं मंत्रिपद वाचवा असं म्हणत गजाजन काळे यांनी हा चिमटा काढला आहे. असं केल्याने तुम्ही तुमच मंत्रिपद नाही पण किमान आदित्य ठाकरे यांच मंत्रिपद तरी वाचऊ शकता, असा उपहासात्मक सल्ला गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दरम्यान , राजकीय वर्तुळात चालू असलेल्या सत्तानाट्ट्याचा शेवट कधी आणि काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arjun-Malaika : ‘या’ कारणांमुळे अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायकाला म्हणाला चोर
- Nilesh Rane : “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले”, निलेश राणेंनी ‘मविआ’ला डिवचले
- Eknath Shinde : “उद्या बहुमत चाचणीत…” ; कामख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया!
- Amol Mitkari : “बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत कसा निघतो, नक्कीच…” ; अमोल मिटकरींचा राज्यपालांना खोचक सवाल
- Supreme Court : मलिक-देशमुखांची कोर्टाकडे फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची मागणी; आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
