Share

Supreme Court : मलिक-देशमुखांची कोर्टाकडे फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची मागणी; आज होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले असून यासाठी फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. उद्या (३० जून) मविआ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन नेते अर्थातच मंत्री नवाब मलिक (NCP leaders Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

तुरुंगात बंद असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या महाराष्ट्रातील फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आज संध्याकाळी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!