Share

ठाकरे म्हणतात…कोरोनाची लस आली तरी तब्बल ‘इतके’ महिने मास्क बंधनकारकच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.

दरम्यान, काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती. यानंतर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे.

यासंदर्भात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ‘देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे,’ असं सांगत त्यांनी मास्क लावण्यासह कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं हे कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य : उद्धव ठाकरे

७० ते ७५ टक्के नागरिक हे मास्क वापरत असून उरलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य आहे. तर, अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता असल्याचं सांगत त्यांनी अधिक खबरदारी घ्यावी असं देखील सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!