Share

पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट

Published On: 

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोनल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आश्वास्त केलं आहे, पण ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे शेतकरी आंदोनलाचा 24 वा दिवस उजाडला असतानाचा पतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वाराला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरु तेग बहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे.नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वारात जाऊन शीख समुदायाचे 9 वे गुरू तेग बहादूर यांना नमन केले.

गुरू तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींचा आजचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदींच्या गुरुद्वारा भेटीचं कुठलंही नियोजन नव्हता, विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापनालाही यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे, मोदींच्या या दौऱ्यावर चर्चेला उधाण आलं आहे.

याठिकाणी वाहतूक तर थांबवण्यात आलं नव्हतच पण सामान्य दिवसाप्रमाणेच व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्था देखील नेहमीप्रमाणेच होती. यावेळी कोणता विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!