Share

सर्वसामान्यांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित; स्वस्त गाड्यांमध्येही असणार ‘ही’ सुविधा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण अधिक वाढलं असून केंद्र सरकार याचा विचार करत आहे. ओवर स्पीडिंग किंवा कारच्या धडकेत मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक वाढलं आहे. कारमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी कार कंपन्या मागील काही वर्षांपासून कार सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. तसंच ग्राहकांचाही कार खरेदी करताना, कारमधील सेफ्टी फीचर्सकडे कल वाढतो आहे. परंतु आताही केवळ एन्ट्री लेवलच्या स्वस्त कार्समध्ये ड्रायव्हिंग सीटसाठी एअरबॅग आहे, आणि थोडे अधिक पैसे भरून ड्युअल एअरबॅग्ससारखे फीचर्स मिळतात.

अधिकतर कार्समध्ये आता रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडरसारखे फीचर्स मिळतात, परंतु एअरबॅगसारख्या लाईफ सेव्हिंग फीचरला अद्यापही तितकंस महत्त्व दिलं जात नाही. जर 10 लाख आणि त्याहून अधिक रुपयांची कार खरेदी केल्यास, त्यात मल्टीपल एअरबॅग मिळतात. परंतु 5 लाख रुपयांहून कमी किंवा अधिकची कार खरेदी केल्यास त्यात एक किंवा दोन एअरबॅग मिळतात. त्यामुळे आता स्वस्तातल्या स्वस्त कारमध्येही ड्युअल एअरबॅग्स असणं अनिवार्य करण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर लागू करण्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, करोना काळात मंदावलेला वाहन उद्योग गतीमान होत आहे. ग्राहकांकडून देखील वाहन खरेदीला प्रतीसाद दिला जात आहे. मात्र आत नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाहने महाग होणार असल्याच सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आणखी एका वेगळ्या कारण मुळे आगामी काळात सीएनजी आणि एलपीजी गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!